26
दुसरी जनगणना
1पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले, 2“इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.” 3म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले, 4“याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.”
इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे:
5रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे:
हनोखपासून हनोखी कूळ;
पल्लूपासून पल्लूवी कूळ;
6हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ;
कर्मीपासून कर्मी कूळ.
7ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.
8पल्लूचा पुत्र एलियाब होता, 9आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते. 10ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते. 11तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.
12शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
नेमूएलपासून नेमूएली कूळ;
यामीनपासून यामीनी कूळ;
याकीनपासून याखीनी कूळ;
13जेरहपासून जेरही कूळ;
शाऊलपासून शाऊली कूळ.
14ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
15गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
जेफोनपासून जेफोनी कूळ;
हग्गीपासून हग्गी कूळ;
शूनीपासून शूनी कूळ;
16ओजनीपासून ओजनी कूळ;
एरीपासून एरी कूळ;
17अरोदपासून अरोदी कूळ;
अरेलीपासून अरेली कूळ.
18ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.
19एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.
20यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
शेलाहपासून शेलानी कूळ;
पेरेसापासून पेरेसी कूळ;
जेरहपासून जेरही कूळ.
21पेरेसचे वंशज हे होते:
हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ;
हामूलपासून हामूली कूळ.
22ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.
23इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
तोलापासून तोलाई कूळ;
पुवाहपासून पुनी#26:23 पुनी काही मूळ प्रतींनुसार पुन्नीह कूळ;
24याशूबपासून याशूबी कूळ;
शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ.
25ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.
26जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
सेरेदपासून सेरेदी कूळ;
एलोनपासून एलोनी कूळ;
याहलीलपासून याहलेली कूळ.
27ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.
28योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:
29मनश्शेहचे वंशज:
माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता);
गिलआदापासून गिलआदी कूळ.
30हे गिलआदाचे वंशज होते:
इएजेरपासून इएजेरी कूळ;
हेलेकपासून हेलेकी कूळ;
31अस्रिएलपासून अस्रिएली कूळ;
शेखेमपासून शेखेमी कूळ;
32शेमीदापासून शेमीदाई कूळ;
हेफेरपासून हेफेरी कूळ.
33(हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)
34ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.
35एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
शुथेलहपासून शूथेलाही कूळ;
बेकेरपासून बेकेरी कूळ;
तहनपासून तहनी कूळ.
36शुथेलहाचे वंशज हे होते:
एरानपासून एरानी कूळ.
37हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली.
हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते.
38बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
बेलापासून बेलाई कूळ;
आशबेलपासून अशबेली कूळ;
अहीरामपासून अहीरामी कूळ;
39शफूफामपासून#26:39 काही मूळ प्रतींमध्ये शेफूफाम शूफामी कूळ;
हूफामपासून हूफामी कूळ.
40आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते:
आर्दाचे आर्दी कूळ;
नामान द्वारे नामीनी कूळ.
41ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.
42दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
शूहामपासून शूहामी कूळ.
ही दानची कुळे होती: 43ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.
44आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
इम्नाहपासून इम्नी कूळ;
इश्वीपासून इश्वी कूळ;
बरीयाहपासून बरीयाह कूळ;
45आणि बरीयाहच्या वंशजांपासून:
हेबेरपासून हेबेरी कूळ;
मालकीएलपासून मालकीएली कूळ.
46आशेरला सेराह नावाची कन्या होती.
47ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
48नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
याहसेलपासून याहसेली कूळ;
गूनीपासून गूनी कूळ;
49येसेरपासून येसेरी कूळ;
शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ.
50ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.
51इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.
52याहवेहने मोशेला म्हटले, 53“त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा. 54मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा. 55जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा. 56प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.”
57ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे:
गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ;
कोहाथापासून कोहाथी कूळ;
मरारीपासून मरारी कूळ.
58ही देखील लेवी लोकांची कुळे होती:
लिब्नी कूळ,
हेब्रोनी कूळ,
महली कूळ,
मूशी कूळ,
कोरही कूळ.
कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता; 59अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला. 60अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता. 61परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.
62एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.
63मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली. 64सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता. 65कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.