Logo YouVersion
Icona Cerca

गणना 16:30-32

गणना 16:30-32 MRCV

परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.” त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.