मत्तय 28

28
येशू जिवंत होते
(मार्क 16:1-8; लूका 24:1-12; योहान 20:1-10)
1आरामाच्या दिवसानंतर पयल्या दिवशी लय सकाळीच मगदला गावची मरिया व दुसरी मरिया ह्या कब्रेले पाह्यासाठी आल्या. 2तवा पाहा, एक मोठा भूकंप झाला, अन् देवाचा एक देवदूत स्वर्गातून उतरला, अन् जवळ येऊन त्यानं त्या कबरेच्या गोल गोट्याले एका बाजूने लोटल, अन् त्याच्यावर तो बसला. 3त्याचवालं रूप विजे सारखे चमचमीत, अन् त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
4त्याच्यावाल्या भितीनं पाहारेकरी थरथर कापले अन् मेलेल्या सारखे झाले. 5तवा देवदूताने त्या बायायले म्हतलं, “भेऊ नका, मले मालूम हाय कि तुमी येशूले जो वधस्तंभावर चढवल्या गेला होता, त्याले पायत हा. 6तो अती नाई हाय, पण तो आपल्या म्हणल्या प्रमाणे जिवंत झाला हाय, या, व हे जागा पाहा, जतीसा प्रभूले ठेवलं होतं.
7अन् लवकर जाऊन त्याच्या शिष्यायले सांगा कि तो मेलेल्यातून जिवंत झाला हाय, पाहा तो तुमच्या पयले गालील प्रांतात जात हाय, ततीसा तुमाले तो दिसन, लक्षात ठेवजा जे मी तुमाले सांगतले हाय.” 8तवा त्या बाया भीतीने अन् मोठ्या आनंदाने कबरेच्या पासून लवकर निघून, येशूच्या शिष्यायले सुवार्था देण्यासाठी पयत गेल्या.
बायायले येशूचे दर्शन
9तवा येशू त्यायले एकदमचं लवकर भेटला, अन् म्हतलं, “तुमाले शांती मिळो” अन् त्यायनं जवळ येऊन येशूचे पाय पकडले अन् त्याची आराधना केली. 10तवा येशूने त्यायले म्हतलं, “भेऊ नका माह्याल्या शिष्यायले जाऊन सांगा, कि गालील प्रांतात चालले जा ततीसा तुमी मले पायसान.”
पाहारेकरी याची माईती
(मार्क 16:14-18; लूका 24:36-49; योहान 20:19-23; प्रेषित 1:6-8)
11जवा त्या बाया शिष्यायले सांगाले जाऊनच रायल्या होत्या, कि पहरेदारा पैकी बऱ्याचं पहरेदारानी नगरात जाऊन पूर्ण हालचाल मुख्ययाजकायले सांगून देली. 12तवा त्यायनं यहुदी पुढाऱ्याय संग एकजूट होऊन सल्ला केला अन् लाचं म्हणून लय पैसे देले. 13हे सांगासाठी कि रात्री जवा आमी राखण कऱ्याच्या वाक्ती झोपून रायलो होतो, तवा येशूच्या शिष्यांनी येऊन त्याचं शरीर चोरून घेऊन गेले.
14अन् जर हे गोष्ट राज्यपालापासी पोहचली तर आमी त्याले समजावून देऊ, अन् तुमाले जोखीम पासून वाचवून घेऊ. 15मंग त्यायन पैसे घेऊन जसं शिकवलं गेलं होतं तसचं केलं, अन् हे गोष्ट तवा पासून तर आजपर्यंत यहुदी लोकात चालू हाय.
शेवटची आज्ञा
(मार्क 16:14-18; लूका 24:36-49; योहान 20:19-23; प्रेषित 1:6-8)
16अन् मंग अकरा शिष्य गालील प्रांताच्या त्या पहाडावर गेले, ज्याच्या बाऱ्यात येशूने तती भेट्यासाठी सांगतल होतं. 17तवा शिष्यायनं येशूच दर्शन पाऊन ततीसा नतमस्तक झाले, अन् आराधना केली, पण कोण्या कोणाले शंका वाटली कि हा जिवंत झाला हाय कि नाई.
18तवा येशूनं शिष्यायपासी येऊन म्हतलं, “स्वर्गाचा अन् पृथ्वीचा सगळा अधिकार मले देला हाय. 19म्हणून तुमी जा, अन् सगळ्या देशातल्या लोकायले शिष्य बनवा, अन् त्यायले बाप, पोरगा, अन् पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20अन् त्यायले सगळ्या गोष्टी जे मी तुमाले आज्ञा देल्या हाय, ते मानाले शिकवा, अन् पाहा मी जगाच्या शेवटपर्यंत नेहमी तुमच्या संग हाय.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录