मार्क वळख

वळख
नवा करारमा येशुना जिवननं वर्णन ज्या चार पुस्तकसमा करेल शे. त्या पुस्तकसले शुभवर्तमान म्हणतस त्या पुस्तकसपैकी मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान हाई एक पुस्तक शे. येशु मरानंतर ह्या चारही शुभवर्तमान एकमांगे एक मत्तय, मार्क, लूक अनी योहान यासनी लिखात. या चारीसपैकी मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान हाई सर्वात धाकलं पुस्तक शे. काही तज्ञ लोकसनी मान्य करं की, मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान बाकीना तिन शुभवर्तमानसना पहिले येशुना जन्मना ६५-७० वर्षनंतर लिखायनं. अनं लिखानं कारण म्हणजे रोम शहरना ख्रिस्ती मंडळीसना आत्मईश्वास वाढाकरता अनं त्यासले प्रोत्साहन भेटाकरता लिखाई गयं.
हाऊ मार्क कोण शे? संत पौल अनं बर्णबा यासना हाऊ तरूण सोबती योहान मार्क म्हणजेच मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान ह्या पुस्तकना लेखक. मार्क पहिला मिशनरी प्रवासमा त्याना सोबतीसले मझारमाच सोडीन निंघी गया. त्यामुये त्याना आत्मसन्मानले ठेच पोहंचनी प्रेषित १३:१३ नंतर मात्र हाऊच मार्क बर्णबासंगे सेवा कार्यमा सहभागी व्हयेल दखास प्रेषित. १५:३७-३९ हाऊ मार्क पेत्रना जवळना मित्र व्हता १ पेत्र ५:१३ प्रमाणे. तज्ञसनी अस मान्य करेल शे की, जरी मार्कनी येशुनं जिवन अनं सेवा प्रत्यक्ष दखी नही तरी पेत्रना साक्षना आधारवर त्यानी त्यानं शुभवर्तमान लिखं. मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमानना मुख्य दोन विषय म्हणजे ख्रिस्ती शिष्य कसं बनानं अनी शेवटला काळ विषयी येशुनी करेल भविष्य.
रूपरेषा
१. बाप्तिस्मा करनारा योहान अनं येशुना बाप्तिस्मा. १:१-१३
२. येशुनी गालील प्रदेशमा अनं परीसरमा करेल चमत्कार. १:१४–९:५०
३. गालील ते येरूशलेमपावत येशुना प्रवास अनं मंदीरमा प्रवेश. १०:१–१२:४४
४. येशुनी शेवटला काळबद्दल करेल भविष्य. १३:१-३७
५. येशुनं मरणं, पुनरूत्थान अनं महान आदेश. १४:१–१६:२०

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录