लूक प्रस्तावना

प्रस्तावना
लूकरचित शुभवर्तमानात येशूला इस्राएलचा वचनदत्त उद्धारक व सर्व मानवांचा तारणारा म्हणून सादर करण्यात आलेले आहे. लूक असे नमूद करतो की, येशूला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने गरिबांना शुभवर्तमान घोषित करण्याकरिता आमंत्रित केले होते. ह्या शुभवर्तमानात गरजवंतांविषयीचा कळवळा प्रभावीपणे अभिव्यक्त झालेला आहे. प्रस्तुत शुभवर्तमानाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, ह्यात आनंदाचा सूर अचूकपणे जाणवतो. विशेषतः शुभवर्तमानाच्या प्रारंभी येशूच्या जन्माची कथा सांगताना व शुभवर्तमानाच्या शेवटी पुनरुत्थानाचा व स्वर्गारोहणाचा उल्लेख करताना ओळीओळींतून आनंदलहरी उसळत असलेल्या भावतात. ह्याच लेखकाने ‘प्रेषितांचे कार्य’ ह्या पुस्तकात ख्रिस्ती श्रद्धेच्या वृद्धीची व प्रसाराची गाथा शब्दांकित केलेली आहे.
देवदूतांचे गायन, मेंढपाळांची भेट, एक मुलगा म्हणून येशूची मंदिरात उपस्थिती, चांगल्या शेजाऱ्याची गोष्ट व उधळपट्टी करणाऱ्या मुलाचा दाखला असे बरेच साहित्य फक्त याच शुभवर्तमानात सापडते.
प्रार्थना, पवित्र आत्मा, स्त्रियांचे ख्रिस्ती समाजातील स्थान व परमेश्वराची क्षमाशील वृत्ती हे मुद्दे सदर शुभवर्तमानात अधोरेखित करण्यात आले आहेत.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-4
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा जन्म व बालपण 1:5-2:52
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे कार्य 3:1-20
येशूचा बाप्तिस्मा 3:21-4:13
येशूचे गालीलमधील सार्वजनिक कार्य 4:14-9:50
गालीलहून यरुशलेममध्ये 9:51-19:27
यरुशलेममधील शेवटचा आठवडा 19:28-23:56
पुनरुत्थान, दर्शने व स्वर्गारोहण 24:1-53

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录