लूक 10

10
येशु बहात्तर शिष्यसले कामवर धाडस
1ह्यानानंतर प्रभुनी आखो बहात्तर जणसले नेमीन ज्या ज्या गावसमा अनी ज्या ज्या ठिकानवर तो स्वतः जाणार व्हता तठे दोन दोन असं त्यासले आपलापुढे धाडं. 2#मत्तय ९:३७,३८तवय येशुनी त्यासले सांगं, “पिक बराच शे, पण मजुर थोडाच शेतस यामुये प्रभु जो कापणीना मालक शे त्यानी कापणीकरता मजुर धाडाले पाहिजे म्हणीन प्रार्थना करा. 3#मत्तय १०:१६जा! दखा, लांडगासमा कोकरूले धाडतच तसं मी तुमले धाडी ऱ्हायनु. 4पिसोडी, झोळी किंवा पायजोडा लेवु नका; वाटमा कोणलेच नमस्कार करू नका. 5ज्या कोणता घरमा तुम्हीन जाशात तठे, या घरले शांती असो, अस पहिले म्हणा. 6जर तठे कोणी शांतीना योग्य व्हई, तर तुमनी शांती त्यानावर राही; नहीतर ती शांती तुमनाकडे परत ई. 7#१ करिंथ ९:१४; १ तिमथ्य ५:१८त्याच घरमा ऱ्हा त्या जे देतीन ते खातपित ऱ्हावा, कारण मजुरले मजुरी मिळनं योग्य शे, घरोघर फिरू नका. 8कोणता बी गावमा जाशात अनी त्यासनी तुमना स्विकार करा तर त्या जे तुमले वाढतीन तेच खा. 9तठे ज्या आजारी व्हतीन त्यासले बरं करा, अनी त्यासले सांगा की, ‘देवनं राज्य तुमना जोडे येल शे.’ 10#प्रेषित १३:५१तुम्हीन कोणता बी गावमा जाशात अनी त्यासनी तुमना स्विकार करा नही तर त्यासना गल्लीमा बाहेर जाईन अस म्हणा, 11#मत्तय १०:७-१४; मार्क ६:८-११; लूक ९:३-५‘आमना पायले लागेल तुमना गावनी धुळ ती बी तुमनी तुमले झाडी टाकतस. पण हाई ध्यानमा ठेवा की, देवनं राज्य जोडे येल शे!’ 12#मत्तय ११:२४; मत्तय १०:१५मी तुमले सांगस, त्या गावपेक्षा सदोमले न्यायना दिनले सोपं पडी!”
बिनईश्वासी गावसबद्दल दुःख
(मत्तय ११:२०-२४)
13“हे खोराजिना, तुना धिक्कार असो! हे बेथसैदा, तुना धिक्कार असो! कारण तुमनामा ज्या चमत्कारना कामे व्हयनात त्या जर सोर अनं सिदोन या गावसमा व्हतात तर त्यासनी गोणताट अनं राख आंगवर लिसन अनं बशीन मांगेच पश्चाताप करी लेतात. 14यावरतीन न्यायना काळमा तुमनापेक्षा सोर अनं सिदोन या गावसले सोपं पडी. 15हे कफर्णहुम! ‘तुले स्वर्गपावत चढाईन जाता ई का? तु मृत्युलोकसपावत खाल टाकाई जाशी!”
16 # मत्तय १०:४०; मार्क ९:३७; लूक ९:४८; योहान १३:२० येशु त्याना शिष्यसले बोलना, “जो तुमनं ऐकस तो मनं ऐकस; जो तुमना नाकार करस तो मना नाकार करस; अनी जो मना नाकार करस तो ज्यानी माले धाडं त्याना नाकार करस.”
बहात्तर शिष्य परत येतस
17मंग त्या बहात्तर शिष्य आनंदमा परत ईसन बोलनात, “प्रभुजी, तुमना नावतीन दुष्ट आत्मा बी आमनी आज्ञा मानतस.”
18येशु शिष्यसले बोलना, “मी सैतानले आकाशमातीन ईजनामायक पडतांना दखं. 19ऐका! मी तुमले साप अनं ईच्चु यासनावर उभं ऱ्हावाना अनी शत्रुना सर्व शक्तीवर विजय मिळावाना अधिकार देयल शे, तुमले कसानीच हानी व्हवाव नही. 20तरी दुष्ट आत्मा तुमनी आज्ञा मानतस याना आनंद मानु नका; तर तुमना नावे स्वर्गमा लिखेल शेतस याना आनंद माना.”
येशुनी करेल उपकारस्मरण
(मत्तय ११:२५-२७; १३:१६,१७)
21त्याच येळले येशु पवित्र आत्मामा भलताच खूश व्हईन बोलना, “हे बापा, स्वर्गना अनं पृथ्वीना प्रभु! मी तुनी स्तुती करस; कारण तु ज्ञानी अनी ईचारवंत यासपाईन हाई गोष्ट गुप्त ठिसन अनपडसमा प्रकट कऱ्यात, हे बापा, कारण अस करनं तुले योग्य दखायनं.”
22 # योहान ३:३५; योहान १०:१५ “मना बापनी मना हातमा सर्वकाही सोपेल शे; पोऱ्या कोण शे हाई बापशिवाय कोणलेच माहीत नही, अनी बाप कोण शे हाई पोऱ्याशिवाय अनं पोऱ्यानी ईच्छा व्हई तर तो ज्याले त्यानी वळख करी देस त्यानाशिवाय कोणलेच माहीत नही.”
23मंग शिष्यसकडे वळीन येशु गुपचुप बोलना, “तुम्हीन जे दखतस ते ज्या डोया दखतस त्या धन्य शेतस! 24मी तुमले सांगस, जे तुम्हीन दखतस ते बराच संदेष्टासनी अनं राजासनी दखानी ईच्छा धरी पण दखं नही, तुम्हीन जे ऐकतस ते ऐकानी बी ईच्छा त्यासनी धरी पण ऐक नही.”
चांगला शोमरोनीना दृष्टांत
25 # मत्तय २२:३५-४०; मार्क १२:२८-३४ मंग दखा, एक शास्त्री उभा राहीन येशुनी परिक्षा दखाकरता बोलना, “गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी?”
26येशुनी त्याले उत्तर दिधं, “मोशेना नियमशास्त्रमा काय लिखेल शे? तु काय वाचस?”
27त्यानी उत्तर दिधं, “नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, तु आपला देव यहोवा यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण शक्तितीन अनं पुर्ण बुध्दीतीन प्रिती कर; अनी ‘जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.’ ”
28येशुनी त्याले सांगं, “तु बराबर उत्तर दिधं; ‘हाईच कर’ म्हणजे वाचशी.”
29पण स्वतःले धार्मीक ठरावानी ईच्छा धरीन तो येशुले बोलना, “मना शेजारी कोण शे?”
30येशुनी उत्तर दिधं, “एक माणुस यरूशलेमतीन खाल यरीहोले जाई राहींता तो लुटारूसना हातमा सापडना, त्यासनी त्याना कपडा काढीन त्याले मारं अनं अर्धमरेल टाकीन त्या निंघी गयात. 31एक याजक त्याच वाटतीन खाल जाई राहींता; तो त्याले दखीन दुसरी वाटतीन निंघी गया. 32तसाच एक लेवी बी तठेन जाई राहींता अनी ती जागावर पोहचीन जवय त्यानी त्याले दखं तवय तो बाजुतीन निंघी गया. 33मंग एक शोमरोनी तिच वाट वरतीन जाई राहींता, तो तठे वना, अनी त्याले दखीन त्याले त्याना कळवळा वना. 34त्यानी जोडे जाईन त्याना जखमसले तेल अनं द्राक्षरस लाईन पट्ट्या बांध्यात, अनी त्याले आपली सवारीवर बसाडीन उतारशाळमा लई वना अनी त्यानी काळजी लिधी. 35दुसरा दिन निंघाना येळले त्यानी दोन चांदिना शिक्का काढीन उतारशाळना मालकले दिसन सांगं, ‘यानी काळजी ल्या, अनी यानापेक्षा जास्तीना खर्च व्हयना तर तो मी माघारे येवावर तुले दिसु.’”
36यानंतर येशुनी शास्त्रीले ईचारं, “तर लुटारूसना हातमा सापडेल माणुसना शेजारी या तिन्हीसमातीन तुना मते कोण व्हयना?”
37तो बोलना, “जो त्यानावर दया करस तो”
येशुनी त्याले सांगं, “जाय, तु बी तसच कर.”
येशु मार्था अनी मरीयाले भेटस
38 # योहान ११:१ येशु अनी त्याना शिष्य जातांना एक गावमा वनात, तठे मार्था नावनी एक बाईनी आपला घर त्यानं स्वागत कर. 39तिले मरीया नावनी एक बहिण व्हती, ती प्रभुना पायजोडे बशीन त्यानं वचन ऐकी राहींती. 40पण मार्था सेवा चाकरी करता करता नाराज व्हयेल व्हती अनी ती ईसन बोलनी, “प्रभुजी, मनी बहिणनी मना एकलीवर कामना बोझा टाकी देयल शे, यानी तुमले काळजी नही का? माले मदत कराकरता तिले सांगा!”
41प्रभुनी तिले उत्तर दिधं, “मार्था, मार्था! तु बराच गोष्टीसबद्दल काळजी करस अनं व्याकुळ व्हई जास, 42वास्तवमा एकच बात आवश्यक शे, मरीयानी चांगला वाटा निवडी लेयल शे, अनी तो तिनापाईन कोणीच हिसकाडु नही शकस.”

Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:

लूक 10: Aii25

Ìsàmì-sí

Pín

Daako

None

Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀

Àwọn fídíò fún लूक 10