मरकुस 1
1
बाप्तिस्मा करणारा योहान अन् त्याचा संदेश
(मत्तय 3:1-12; लूका 3:1-18; योहान 1:19-28)
1देवाचा पोरगा जो येशू ख्रिस्त हाय त्याच्या बाऱ्यात सुवार्थेची सुरुवात याप्रकारे होते. 2जसं यशया भविष्यवक्ताच्या पुस्तकात लिवलेल हाय, देवाने आपला पोरगा येशू ख्रिस्ताले म्हतलं कि “पाय, मी माह्या संदेशवाहकले तुह्या पयले पाठवतो, तो तुह्या रस्ता मोकया करीन. 3सुनसान जागेतून कोणी तरी लोकायले हे म्हणत होता, कि देवाचा रस्ता तयार करा, अन् त्याचा रस्ता सरखा करा, ज्याच्यावर होऊन तो येईन.”
4योहान बाप्तिस्मा देणारा आला, अन् तो सुनसान जागेत लोकायले यरदन नदीत बाप्तिस्मा देत होता, तो हा संदेश देत होता, कि आपल्या-आपल्या पापांपासून मन फिरवा अन् बाप्तिस्मा घ्या तवा देव तुमाले तुमच्या पापांपासून क्षमा देईन. 5तवा सगळ्या यहुदीया प्रांतातले अन् यरुशलेम शहराचे बरेचशे लोकं सुनसान जागेत योहान बाप्तिस्मा देणाऱ्या पासी आले, अन् त्यायनं आपआपल्या पापायले कबूल करून यरदन नदीत योहान पासून बाप्तिस्मा घेतला.
6योहान बाप्तिस्मा देणारा उंटाच्या केसानं पासून बनवलेले कपडे घालायचा व त्याच्या कमरीले चांबड्याचा कमरपट्टा बांधत जाय, व तो गवतातले उडणारे घोडे अन् सयद खात जाय.
7तो असा संदेश देत होता कि, “माह्यानंतर जो लवकर येणार हाय, तो माह्याहून हि सामर्थवान हाय, मी त्याच्या लायक नाई, कि वाकून त्याच्या जोड्याच्या लेसा पण सोडू नाई शकत. 8मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं केला पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याच्या व्दारे करणार.”
येशूचा बाप्तिस्मा
(मत्तय 3:13-4:11; लूका 3:21,22; 4:1-13)
9त्या दिवसात असं झालं कि, येशू ख्रिस्त गालील प्रांताच्या नासरत नगरातून येऊन यरदन नदीत योहान बाप्तिस्मा देणाऱ्या पासून बाप्तिस्मा घेतला. 10अन् जवा तो पाण्यातून बायर आला, तवा लवकरच त्यानं अभायाले उघडतांना अन् देवाच्या आत्म्याले कबुतराच्या रुपात स्वर्गातून आपल्या वरते उतरताने पायलं 11अन् स्वर्गातून हे वाणी झाली, “कि तू माह्यावाला आवडता पोरगा हाय, तुह्यावर मी खुश हावो.”
येशूची परीक्षा
(मत्तय 4:1-11; लूका 4:1-13)
12मंग देवाचा आत्मा लवकरच येशूला सुनसान जागी घेऊन गेला. 13सुनसान जागी चाळीस दिवस अन् चाळीस रात सैतानाने त्याची परीक्षा घेतली. तो जंगली प्राण्यायच्या संग रायला, व तती देवदूतांनी त्याची सेवा केली.
येशू ख्रिस्ताची सेवकाईची सुरुवात
(मत्तय 4:12-17; लूका 4:14,15)
14काई दिवसाच्या बाद राजा हेरोदाने योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले जेलात टाकले, तवा येशू ख्रिस्तान गालील प्रांतात येऊन लोकायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सुवार्थेचा प्रचार केला. 15तवा त्यानं म्हतलं, “देवाने ठरवलेली वेळ जवळ आलेली हाय व देवाचं राज्य जवळ आले हाय, म्हणून आपआपल्या पापांपासून मन फिरून पश्चाताप करा व सुवार्थेवर विश्वास ठेवा.”
मासोया पकडणाऱ्या लोकायले बलावलं
(मत्तय 4:18-22; लूका 5:1-11)
16एका दिवशी येशू गालील समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन रायला होता, अन् त्यानं शिमोन व त्याचा भाऊ आंद्रियासले समुद्रात जाळं टाकतांना पायलं, कावून कि ते मासोया पकडणारे लोकं होते. 17मंग येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य अनुकरण करा व, माह्याले शिष्य बना, आतापरेंत तुमी मासोया पकळनारे होते, पण आज पासून मी तुमाले हे शिकवतो की लोकायले माह्या जवळ विश्वासात कसं आणावं.”
18मंग त्यायनं लवकरच मासोया पकडनं थांबवलं, अन् ते त्याच्या मांग गेले. 19जवा येशू व त्याचे दोन शिष्य किनाऱ्यावरून समोर चालत गेले, तवा येशूने दोन भावायले पायले त्यायचे नाव याकोब अन् योहान होते, त्यायच्या बापाचे नाव जब्दी होते, ते दोघे एका डोंग्यात बसून आपले जाळे सुधारून रायले होते. 20जसं येशूने त्यायले पायलं, त्यानं त्यायले म्हतलं, माह्या मांग या अन् माह्याल अनुकरण करा अन् त्यायनं आपला बाप जब्दीला मजुराच्या सोबत डोंग्यात सोडून, अन् ते दोघं भाऊ त्याच्या सोबत निघाले
भुत लागलेल्या माणसाले बरं करणे
(लूका 4:31-37)
21येशू अन् त्याचे शिष्य कफरनहूम शहरात आले, जे गालील समुद्राच्या उत्तर दिशेले हाय, तवा येणाऱ्या आरामाच्या दिवशी येशूनं धार्मिक सभास्थानात जाऊन शिकवण देने सुरु केलं. 22तवा येशूच्या शिकवण्यानं लोकं हापचक झाले, कावून की तो मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षका सारखं नाई, पण अधिकारानं शिकवून रायला होता.
23जवा येशू शिकवण देतचं होता की एकाएकी धार्मिक सभास्थानात भुत लागलेला माणूस त्याने मोठ्या कल्ला केला. 24अन् त्यानं जोऱ्यानं आवाज देऊन म्हतलं, “हे येशू नासरतवासी तू आमाले तरास देऊ नको, मी तुले ओयखतो कि तू कोण हाय, तू देवाचा इकून आला हास, व तू देवाचा पवित्र पोरगा हायस.” 25येशूने त्या भुताले दटावून म्हतलं, “तू शांत राय, अन् त्याच्यातून निघून जा.”
26तवा भुत त्याच्यातून त्याले उभडा तिभडा करून अन् मोठ्यानं कल्ला करून त्याच्यातून निघून गेला. 27या गोष्टीवर सगळे लोकं जे सभास्थानात जमा होते, हापचक होऊन एकदुसऱ्या संग गोष्टी करू लागले, कि “हि गोष्ट काय हाय? हे कसं नवीन प्रकारची शिकवण हाय, तो अधिकारानं भुतायले आज्ञा देते, अन् भुत पण त्याची आज्ञा मानतात.” 28तवा ते लोकं दुसऱ्याईले त्याच्या बाऱ्यात सांगन चालू केलं, हे सगळी गोष्ट लवकरच गालील प्रांताच्या आसपासच्या सगळ्या लोकाईमध्ये पसरली.
येशू लय बिमाऱ्या बऱ्या करते
(मत्तय 8:14-17; लूका 4:38-41)
29त्यानंतर येशू अन् त्याचे शिष्य धार्मिक सभास्थानातून निघाले, तवा ते शिमोन अन् आंद्रियासच्या घरी आले, अन् याकोब व योहान त्यायच्या संग होते. 30त्याचं वाक्ती शिमोनाची सासू तापाने बिमार पडलेली होती, तवा शिमोन अन् आंद्रियास लवकरच येऊन येशूले सांगतल की शिमोनाची सासू बिमार हाय. 31तवा येशू सिमोनाच्या सासू पासी गेला, अन् तिचा हात पकडून तिले उठव्याले मदत केली, अन् तिचा ताप लवकरच बरा झाला, तवा तिनं त्यायले जेवण देऊन त्यांची सेवा केली.
32त्याचं दिवशी संध्याकाळच्या वाक्ती म्हणजे सुर्य डूबल्यावर जवा आरामाचा दिवस संपला, #1:32 यहुदी लोकायचा नियमाच्या अनुसार आरामाच्या एक दिवस पयले पासून सुर्य अस्त होण्याच्या पयले सुरु होते व दुसऱ्या दिवशी सुर्य डूबल्यावर पूर्ण होते. तवा त्या नगरातले लोकं बऱ्याचं बिमार लोकायले, अन् भुत लागलेल्या लोकायले, येशू पासी आणले. 33अन् कफरनहूम नगरातले बरेचसे लोकं घराच्या दरवाज्या बायर जमा झाले. 34अन् त्यानं बऱ्याचं प्रकारच्या बिमार लोकायले चांगलं केलं, बऱ्याचं भुतायले काढलं, व येशूनं त्या भुतायले बोलू नाई देलं, कावून कि त्या भुतायले मालूम होतं कि येशू देवाचा पोरगा हाय.
येशू एकांतात प्रार्थना करते
(लूका 4:42-44)
35अन् येशू दिवस निग्याच्या पयले लवकर उठून बायर गेला, अन् सुनसान जागी जाऊन त्यानं प्रार्थना केली. 36जवा शिमोन अन् त्याच्या दोस्तायले मालूम झालं, की येशू निघून गेला तवा ते त्याले पाह्याले गेले. 37जवा त्यायले येशू भेटला, तवा त्यायनं त्याले म्हतलं कि “बरेचं लोकं तुमाले पावून रायले हाय.” 38तवा येशूने त्यायले म्हतलं, “या आपण जवळपासच्या गावात जाऊ, की तती पण देवाच्या वचनाचा प्रचार करू, कावून की मी याचं कामासाठी जगात आलो हाय.” 39तवा येशू गालील प्रांतातील बऱ्याचं जागी त्यायच्या धार्मिक सभास्थानात जाऊन प्रचार करत जाय, अन् भुते काळत जाय.
कुष्ठरोग्याले बरं करते
(मत्तय 8:1-4; लूका 5:12-16)
40अन् एका दिवशी एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला, अन् त्याच्या पुढे येऊन टोंगे टेकून त्यानं त्याले विनंती केली, “जर तुह्यी इच्छा असील तर मले बरं कर#1:40 बरं कर मोशेच्या नियमाच्या अनुसार या संदर्भात बरं करण्याचा अर्थ हा हाय, की शुद्ध करन..” 41तवा येशूला त्याच्यावर दया आली, अन् त्यानं आपला हात त्याच्यावर ठेवून त्याले म्हतलं, कि “माह्यावाली इच्छा हाय, कि तू बरा हून जाय.” 42मंग तवाच त्याचा कुष्ठरोग चांगला झाला, अन् तो पुरा बरा झाला.
43-44मंग येशूनं त्या माणसाले चिताऊन सांगतल “कि कोणाले ही सांगू नको, की मी तुले बरे केले. पण तू जाऊन याजकाले#1:43-44 याजकाले यहुदी समाजात मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुसार याजक यरुशलेमाच्या देवळात बलिदान अर्पण करत होता. दाखवं, अन् तू चांगल्या झाल्यावर जे काई मोशेनं आपल्या नियमशास्त्रात कऱ्याले लावलं त्याच्याच अनुसार देवाले बलिदान अर्पण कर की लोकायले माईत व्हावं की तू बरा झाला हाय.” 45पण तो माणूस त्या जाग्यावून जाऊन बऱ्याचशा लोकायले जाऊन सांगतले की येशूने त्याले बरे केले, या कारणाने येशू मोकळ्या पणाने त्या नगरात जाऊ शकला नाई, पण तो शहराच्या बायर सुनसान जागी जाऊन जती कोणी नाई रायत तती तो रायत होता.
Айни замон обунашуда:
मरकुस 1: VAHNT
Лаҳзаҳои махсус
Паҳн кунед
Нусха

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.