च्या शोधाचे निकाल: hope
रोमकरांस पत्र 15:13 (MARVBSI)
आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
रोमकरांस पत्र 5:5 (MARVBSI)
आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
रोमकरांस पत्र 5:3 (MARVBSI)
इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,
रोमकरांस पत्र 5:4 (MARVBSI)
धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते;
रोमकरांस पत्र 12:12 (MARVBSI)
आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;
इब्री 11:1 (MARVBSI)
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.
१ करिंथ 13:13 (MARVBSI)
सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.
यिर्मया 29:11 (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.
रोमकरांस पत्र 8:28 (MARVBSI)
परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
यशया 40:31 (MARVBSI)
तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.
१ करिंथ 13:7 (MARVBSI)
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.
२ करिंथ 4:18 (MARVBSI)
आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.
योहान 16:33 (MARVBSI)
माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”
रोमकरांस पत्र 8:18 (MARVBSI)
कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.
रोमकरांस पत्र 8:26 (MARVBSI)
तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.
स्तोत्रसंहिता 27:14 (MARVBSI)
परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
यिर्मया 29:13 (MARVBSI)
तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन.
रोमकरांस पत्र 8:24 (MARVBSI)
कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील?
रोमकरांस पत्र 8:25 (MARVBSI)
पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.
इब्री 6:19 (MARVBSI)
ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे.
रोमकरांस पत्र 15:4 (MARVBSI)
धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.
इब्री 10:23 (MARVBSI)
आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे;
रोमकरांस पत्र 5:2 (MARVBSI)
आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.
यशया 41:10 (MARVBSI)
तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.
स्तोत्रसंहिता 42:11 (MARVBSI)
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.