YouVersion लोगो
सर्च आयकॉन

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”नमुना

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

4 पैकी 4 दिवस

चाला

पहिल्या पावलाच्या पलीकडे

या गोष्टीचे समापन त्याच्या नाट्यमय मध्याइतकेच महत्त्वाचे आहे. “तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” हा शेवट दृढ विश्वासाबद्दल अनेक महत्त्वाची सत्ये प्रकट करतो.

प्रथम, लक्ष द्या की वादळ ते नावेत परत येईपर्यंत शांत झाले नाही. कधीकधी देव वादळ शांत करतो; इतर वेळी तो आपल्याला त्यात सांभाळून ठेवतो. दोन्ही चमत्कार आहेत. दोन्ही त्याचे गौरव प्रकट करतात.

दुसरे, या अनुभवाने केवळ पेत्रच नाही तर नावेतील प्रत्येकास बदलून टाकले. तुमचा विश्वासाचा प्रवास फक्त तुमचा नाही. तो तुमचा प्रवास पाहणाऱ्या आणि त्यापासून शिकणाऱ्या सर्वांसाठी आहे, तुमचा विजय आणि तुमचे संघर्ष दोन्ही.

प्रार्थना मुद्दे:

तुमच्या विश्वासाच्या प्रवासाने येशूबद्दलचा तुमचे मत कसे बदलले आहे?

तुमच्या विश्वासाच्या चालीकडे कोण पाहत असेल?

केवळ यशाचे क्षण नव्हे तर संगतवार विश्वास राखण्यास देवाला मदत करण्यास सांगा.

तुमच्या साक्षीने प्रभावित होणाऱ्यांसाठी प्रार्थना करा.

व्यावहारिक अभ्यास

विश्वासाचा वारसा- दस्तऐवजीकरण करण्यासाठी वेळ द्या

तुमच्या विश्वासाचे आतापर्यंतचे मुख्य टप्पे

प्रत्येक टप्प्यावरून शिकलेले धडे

या अनुभवांनी कशाप्रकारे देवाविषयीच्या तुमच्या दृष्टिकोनास आकार दिला आहे

तुमच्या प्रवासाद्वारे कोणावर प्रभाव पडला आहे

देव तुम्हाला कोणत्या पुढल्या पावलांसाठी बोलवत आहे

चिंतन प्रश्न:

या अनुभवाने येशूविषयीचे शिष्यांचे मत कसे बदलले?

आमच्या विश्वासाचा प्रवास टिकवून ठेवण्यात उपासनेची काय भूमिका आहे?

तुम्ही तुमच्या अनुभवांचा उपयोग इतरांस त्यांच्या विश्वासात प्रोत्साहन देण्यासाठी कसा करू शकता?

या योजनेविषयी

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

दळी वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या तारवातून घोंघावणाऱ्या पाण्यात पाऊल टाकतांना पेत्राने म्हटले, “मला आज्ञा द्या.” या दोन शब्दांनी त्याचे जीवन बदलून टाकले. तारवापासून येशूपर्यंतचा त्याचा प्रवास विश्वास, लक्ष आणि परिवर्तन याबद्दल कालातीत सत्ये प्रकट करतो. हा 4 दिवसांचा भक्तीबोध मत्तय 14:28-33 चे विवेचन करतो, तुम्हाला येशूचे पाचारण ओळखण्यास, विश्वासाने भीतीवर मात करण्यास आणि त्याच्यावर अढळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या तारवाच्या काठावर असाल किंवा पाण्यावर चालायला शिकत असाल, तेव्हा सामान्य विश्वासणारे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस करतात तेव्हा काय होते ते शोधा.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Zero चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: www.zeroconferences.com/india