रोमकरांस पत्र 3:10-19
रोमकरांस पत्र 3:10-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे; त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
रोमकरांस पत्र 3:10-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.” “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.” “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात, दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात, आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.” “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.” आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.
रोमकरांस पत्र 3:10-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.
रोमकरांस पत्र 3:10-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत. विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखून घेतला नाही. देवाचे भय त्यांना ठाऊक नाही. आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.