YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोम. 3:10-19

रोम. 3:10-19 IRVMAR

पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे; त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.