YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 12:10-13 - Compare All Versions

रोमकरांस पत्र 12:10-13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.

रोमकरांस पत्र 12:10-13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा. आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा. आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा. जे गरजवंत असे प्रभूचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 MRCV

रोमकरांस पत्र 12:10-13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा; आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा; पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.

रोमकरांस पत्र 12:10-13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.