YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 6:2-3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 6:2-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार?

स्तोत्रसंहिता 6:2-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?

स्तोत्रसंहिता 6:2-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत. माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?

सामायिक करा
स्तोत्रसंहिता 6 MRCV