स्तोत्रसंहिता 112:7-10
स्तोत्रसंहिता 112:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल. दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.
स्तोत्रसंहिता 112:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील. गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल. दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील; ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील, आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.
स्तोत्रसंहिता 112:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2 हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.