YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 112

112
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट
1परमेश्वराची स्तुती करा.
जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो,
जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
2त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील;
धार्मिक आशीर्वादित होतील.
3धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत;
त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते.
4धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो;
तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
5जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो,
जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
6कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही;
नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
7तो वाईट बातमीला भिणार नाही;
त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
8त्याचे हृदय निश्चल आहे,
आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
9तो गरीबांना उदारपणे देतो;
त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील;
तो सन्मानाने उंचविला जाईल.
10दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील;
तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल;
दुष्टाची इच्छा नाश होईल.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 112: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन