फिलिप्पैकरांस पत्र 2:7-8
फिलिप्पैकरांस पत्र 2:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
फिलिप्पैकरांस पत्र 2:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
फिलिप्पैकरांस पत्र 2:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
फिलिप्पैकरांस पत्र 2:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत.