YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा: ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही; उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले. म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली, परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो: तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा; आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे.

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 MARVBSIफिलिप्पैकरांस पत्र 2:5-11 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा