फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7
फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले
फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा: ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही; उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो: तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.