फिलिप्पैकरांस पत्र 2:13-15 - Compare All Versions
फिलिप्पैकरांस पत्र 2:13-15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
फिलिप्पैकरांस पत्र 2:13-15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे. जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल.
फिलिप्पैकरांस पत्र 2:13-15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता
फिलिप्पैकरांस पत्र 2:13-15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो. जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा. ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे.