YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:54-61

मत्तय 27:54-61 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.” तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या. त्यांच्यात मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई या तेथे होत्या. संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.

सामायिक करा
मत्तय 27 वाचा

मत्तय 27:54-61 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!” अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती. संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य, पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले, आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला. मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.

सामायिक करा
मत्तय 27 वाचा

मत्तय 27:54-61 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले; ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या.

सामायिक करा
मत्तय 27 वाचा

मत्तय 27:54-61 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.” तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे ह्यांची आई मरिया व जब्दीची पत्नी ह्यांचा समावेश होता. संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला. म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले. ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या.

सामायिक करा
मत्तय 27 वाचा