YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:54-61

मत्तय 27:54-61 MRCV

जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!” अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती. संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य, पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले, आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला. मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.