YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 15:1-16

ईयोब 15:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला, “शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का? तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय? खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस. तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे. मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का? तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का? आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे? केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत. देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय? तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस, तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात. मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार? पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही. असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?

सामायिक करा
ईयोब 15 वाचा

ईयोब 15:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले: “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय? कुचकामी शब्दांनी, आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय? परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो. तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो. माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते. “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का? परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का? आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे? केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत. परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का? तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात, यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे? “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत? जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही, तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!

सामायिक करा
ईयोब 15 वाचा

ईयोब 15:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग अलीफज तेमानी म्हणाला, “सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्‍याने भरील काय? निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय? तू तर देवाचे भय सोडले आहेस; तू देवचिंतनाचा संकोच करतोस. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे, मी नाही; तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे. पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय? देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहेस काय? आम्हांला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हांला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे? पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत. देवाने केलेले सांत्वन आणि तुझ्याशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय? तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस? तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस? मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार? पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!

सामायिक करा
ईयोब 15 वाचा