YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 5:13-16

याकोब 5:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.

सामायिक करा
याकोब 5 वाचा

याकोब 5:13-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत. तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल. यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.

सामायिक करा
याकोब 5 वाचा

याकोब 5:13-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत. तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना1 बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.

सामायिक करा
याकोब 5 वाचा

याकोब 5:13-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चंच्या वडील जनांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला ऑलिव्ह तेल लावावे व त्याच्यावर ओणवे होऊन प्रार्थना करावी. श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल. तर मग तुम्ही आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.

सामायिक करा
याकोब 5 वाचा

याकोब 5:13-16

याकोब 5:13-16 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा