गलतीकरांस पत्र 6:7-8
गलतीकरांस पत्र 6:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
गलतीकरांस पत्र 6:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो! जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
गलतीकरांस पत्र 6:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.
गलतीकरांस पत्र 6:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल.