YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलातीकरांस 6

6
सर्वांचे भले करावे
1प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल. 2एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. 4प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही. 5आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे. 6ज्यांना परमेश्वराच्या वचनातून शिक्षण मिळाले आहे, त्यांनी शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा द्यावा.
7फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो! 8जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू. 10म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्‍यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.
सुंता नव्हे परंतु नवी उत्पत्ती
11मी स्वतःच्याच हाताने मोठ्या अक्षरांनी तुम्हाला लिहित आहे!
12जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा. 13ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल. 14आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे. 15सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्त्वाचे आहे. 16जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.
17येथून पुढे मला कोणी त्रास देऊ नये, कारण माझ्या शरीरावर मी येशूंची चिन्हे वागवितो.
18बंधू भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, आमेन.

सध्या निवडलेले:

गलातीकरांस 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन