गलतीकरांस पत्र 6:3-5
गलतीकरांस पत्र 6:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो. पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्यास दुसर्याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.

गलतीकरांस पत्र 6:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही. आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.
गलतीकरांस पत्र 6:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.
गलतीकरांस पत्र 6:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण करावे म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.