YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 3:3-5 - Compare All Versions

निर्गम 3:3-5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.” मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.” देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.

सामायिक करा
निर्गम 3 IRVMAR

निर्गम 3:3-5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.” मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.” परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.”

सामायिक करा
निर्गम 3 MRCV

निर्गम 3:3-5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो.” ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?” देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.”

सामायिक करा
निर्गम 3 MARVBSI