निर्गम 3:3-5
निर्गम 3:3-5 MRCV
तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.” मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.” परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.”



