प्रेषितांची कृत्ये 5:19-21 - Compare All Versions
प्रेषितांची कृत्ये 5:19-21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:19-21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.” हे ऐकून उजाडताच ते परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले, इकडे महायाजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले, आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:19-21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:19-21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले. तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.” ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली.