प्रेषितांची कृत्ये 26:16-18
प्रेषितांची कृत्ये 26:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”
प्रेषितांची कृत्ये 26:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे. मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’
प्रेषितांची कृत्ये 26:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’
प्रेषितांची कृत्ये 26:16-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षीदार असे तुला नेमावे. इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन. त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’