प्रेषितांची कृत्ये 18:2-4
प्रेषितांची कृत्ये 18:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
प्रेषितांची कृत्ये 18:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला, जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे.
प्रेषितांची कृत्ये 18:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पंत येथील अक्विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला. आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.
प्रेषितांची कृत्ये 18:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा पंथ येथील अक्विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला. त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे.