२ शमुवेल 12:13-14
२ शमुवेल 12:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस. पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल.
सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा२ शमुवेल 12:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस. परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”
सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा२ शमुवेल 12:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”
सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा