१ शमुवेल 18:1-3
१ शमुवेल 18:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता. त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
१ शमुवेल 18:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली. त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.
१ शमुवेल 18:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. शौलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले; त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता.