1 शमु. 18:1-3
1 शमु. 18:1-3 IRVMAR
तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता. त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.

