१ इतिहास 23:30-31
१ इतिहास 23:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत. शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.
१ इतिहास 23:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत. आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
१ इतिहास 23:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत. शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.
१ इतिहास 23:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे. तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.