शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा. माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील. मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही. मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे. मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे. जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
फिलिप्पैकरांस 4 वाचा
ऐका फिलिप्पैकरांस 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांस 4:8-13
4 दिवस
चिंता तिच्या सर्व प्रकारांद्वारे आपल्याला दुर्बल करणारी अशी ठरू शकते. कारण ती आपले संतुलन घालवू शकते आणि आपल्याला भीतीमध्ये बांधून ठेवू शकते. हा कथेचा शेवट नाही, कारण येशूमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आणि संघर्षावर मात करण्याची कृपा मिळते. आपण त्यावर केवळ मात करू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी अधिक चांगले केले जाऊ शकतो देवाच्या वचनाचे आणि आश्वसन देणाऱ्या त्याच्या सतत उपस्थितीसाठी त्याचे आभार.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ