YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:20-24

मत्तय 1:20-24 MRCV

परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.” प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”). योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले.