YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 1:1-5

याकोब 1:1-5 MRCV

परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो. धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.