YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 24

24
याजकांचे विभाजन
1अहरोनाच्या वंशजाची विभागणी:
अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार. 2नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत. 3दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली. 4एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले. 5कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.
6लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.
7प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली,
दुसरी यदायाह,
8तिसरी हारीम,
चवथी सोरीम,
9पाचवी मल्कीयाह,
सहावी मियामीन,
10सातवी हक्कोस,
आठवी अबीयाह,
11नववी येशूआ,
दहावी शखन्याह,
12अकरावी एल्याशीब,
बारावी याकीम,
13तेरावी हुप्पाह,
चौदावी येशेबियाब,
14पंधरावी बिल्गाह,
सोळावी इम्मेरा,
15सतरावी हेजीरा,
अठरावी हप्पिसेसा,
16एकोणविसावी पथह्याह,
विसावी यहेज्केल,
17एकविसावी याखीन,
बाविसावी गामूल,
18तेविसावी दलायाह,
चोविसावी माझियाह.
19त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.
बाकीचे लेवी
20लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती:
अम्रामाचे पुत्र: शूबाएल;
शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.
21रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.
22इसहारचे पुत्र: शलोमोथ;
शलोमोथाचे पुत्र: यहथ.
23हेब्रोनाचे पुत्र:
यरीयाह प्रथमपुत्र, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.
24उज्जीएलाचे पुत्र: मीखा;
मीखाहच्या पुत्रांपैकी: शामीर.
25मीखाहचा भाऊ: इश्शीयाह;
इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह.
26मरारीचे पुत्र: महली व मूशी.
याजीयाहचा पुत्र: बनो.
27मरारीचे पुत्र:
याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
28महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.
29कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.
30मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ.
हे लेव्यांचे वंशज आपआपल्या कुटुंबाप्रमाणे होते.
31अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 24: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन