बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा. माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना; कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न पडता तुम्ही प्रगल्भ व पूर्ण व्हावे. परंतु जर तुमच्यापैकी कोणी सुज्ञतेत उणा असेल, तर त्याने ती देवाजवळ मागावी म्हणजे ती त्याला मिळेल कारण तो सर्वांना आनंदाने व उदारपणाने देतो.
याकोब 1 वाचा
ऐका याकोब 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 1:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ