मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला. त्याच्या छायेने पर्वत, आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या1 नदीपर्यंत लांबवले. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारेजाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात. रानडुकर त्याची नासधूस करतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. हे सेनाधीश देवा, तू मागे फीर असे आम्ही तुला विनवतो. स्वर्गातून दृष्टी लावून पाहा व ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर; जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर. ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात. तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो; म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
स्तोत्रसंहिता 80 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 80
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 80:8-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ