YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 80:8-19

स्तोत्रसंहिता 80:8-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला. त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले. तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात. रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे. हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर. ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात. तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो; मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.

स्तोत्रसंहिता 80:8-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले. तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली. मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने पर्वतदेखील झाकले गेले; त्या फांद्या समुद्रापर्यंत, तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या. तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले, म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील? रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या. तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या. कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे; तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात. जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या. मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू. हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, तरच आमचे तारण होईल.

स्तोत्रसंहिता 80:8-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला. त्याच्या छायेने पर्वत, आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या1 नदीपर्यंत लांबवले. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारेजाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात. रानडुकर त्याची नासधूस करतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. हे सेनाधीश देवा, तू मागे फीर असे आम्ही तुला विनवतो. स्वर्गातून दृष्टी लावून पाहा व ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर; जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर. ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात. तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो; म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.