YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 11:26-29

गणना 11:26-29 MARVBSI

त्या वेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यांतील एकाचे नाव एलदाद व दुसर्‍याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते; ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता1 तो त्याला म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर.” मोशे त्याला म्हणाला, “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!”