गणना 11:26-29
गणना 11:26-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता. मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.
गणना 11:26-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली. एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.” नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!” पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!”
गणना 11:26-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या वेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यांतील एकाचे नाव एलदाद व दुसर्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते; ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता1 तो त्याला म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर.” मोशे त्याला म्हणाला, “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!”