गणना 11:18-20
गणना 11:18-20 MARVBSI
तू लोकांना सांग की, ‘उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हांला मांस खायला मिळेल.’ ‘आम्हांला खायला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो,’ हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हांला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते केवळ एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस, वीस दिवस खाल, एवढेच नव्हे, तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”

