YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 11:18-20

गणना 11:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

लोकांस सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर, परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर देश का सोडला?

सामायिक करा
गणना 11 वाचा

गणना 11:18-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल. तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस, परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”

सामायिक करा
गणना 11 वाचा

गणना 11:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तू लोकांना सांग की, ‘उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हांला मांस खायला मिळेल.’ ‘आम्हांला खायला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो,’ हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हांला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते केवळ एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस, वीस दिवस खाल, एवढेच नव्हे, तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”

सामायिक करा
गणना 11 वाचा