YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 11:22-36

नहेम्या 11:22-36 MARVBSI

उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते; कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्‍यांची व्यवस्था ठरली होती. यहूदाचा पुत्र जेरह ह्याच्या वंशजांतला मशेजबेल ह्याचा पुत्र पथह्या लोकांसंबधांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता. खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत येशूवात, मोलादात व बेथ-पलेतात, हसर-शूवालात, बैर-शेब्यात व त्याच्या खेड्यांत, सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यांत एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात, जानोहात, अदुल्लामात व त्याच्या खेड्यांत, लाखीशात व त्याच्या शेतवाड्यांत, अजेकात व त्याच्या खेड्यांत वस्ती केली. त्यांनी बैर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली. गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत, अनाथोथात, नोबात, अनन्यात, हासोरात, रामात, गित्तइमात, हादीदात, सबोइमात, नबल्लाटात, लोदात व कारागिरांच्या खोर्‍यातल्या ओनात राहू लागले. लेव्यांपैकी यहूदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.