नहेम्या 11:22-36
नहेम्या 11:22-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे. राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांस सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र. यहूदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशीः किर्याथ-आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी, आणि येशूवा, मोलादा, बेथ-पेलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी, हसर-शुवाल, बैर-शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी. सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे, एन-रिम्मोन, सरा, यर्मूथ जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहूदाचे लोक बैर-शेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते. गिबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी अनाथोथ, नोब, अनन्या, हासोर, रामा, गित्तइम, हादीद, सबोइम, नबल्लट, लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते. लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.
नहेम्या 11:22-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते. राजाने संगीतकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती व त्यांचे दररोजचे कार्य निर्धारित केले होते. पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता. यहूदीयाचे लोक राहत असलेली काही गावे व शेती होती, काही लोक किर्याथ-अर्बा व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, दिबोन व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, यकब्सेल आणि त्यांच्या आसपासची गावे: येशूआ, मोलादाह, बेथ-पेलेट, हसर-शुआल, बेअर-शेबा, आणि त्यांची आसपासची गावे, सिकलाग, मकोनाह व त्यांची आसपासची गावे. एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ, जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली. बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे, अनाथोथ, नोब, अनन्याह, हासोर, रामाह, गित्ताइम, हादीद, सबोईम, नेबल्लाट, लोद व ओनो व गे-हाराशीम. यहूदीयामध्ये राहणारे काही लेवी बिन्यामीन गोत्राच्या लोकांबरोबर राहण्यासाठी गेले.
नहेम्या 11:22-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते; कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्यांची व्यवस्था ठरली होती. यहूदाचा पुत्र जेरह ह्याच्या वंशजांतला मशेजबेल ह्याचा पुत्र पथह्या लोकांसंबधांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता. खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत येशूवात, मोलादात व बेथ-पलेतात, हसर-शूवालात, बैर-शेब्यात व त्याच्या खेड्यांत, सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यांत एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात, जानोहात, अदुल्लामात व त्याच्या खेड्यांत, लाखीशात व त्याच्या शेतवाड्यांत, अजेकात व त्याच्या खेड्यांत वस्ती केली. त्यांनी बैर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली. गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत, अनाथोथात, नोबात, अनन्यात, हासोरात, रामात, गित्तइमात, हादीदात, सबोइमात, नबल्लाटात, लोदात व कारागिरांच्या खोर्यातल्या ओनात राहू लागले. लेव्यांपैकी यहूदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.