YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 18:12-18

योहान 18:12-18 MARVBSI

मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती. पेत्र येशूला नाकारतो शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागेमागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला; पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.

योहान 18:12-18 साठी चलचित्र