योहान 18:12-18
योहान 18:12-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले. आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता, एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला. पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.
योहान 18:12-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग यहूदी अधिकार्यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले. याच कयफाने यहूदी पुढार्यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे. शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले. मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.” थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.
योहान 18:12-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती. पेत्र येशूला नाकारतो शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागेमागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला; पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.
योहान 18:12-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर सैनिकांची तुकडी, तिचे अधिकारी व यहुदी अधिकाऱ्यांनी पाठवलेले रक्षक ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले. त्या वर्षी उच्च याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांसाठी मरावे, हे हिताचे आहे, असा ह्याच कयफाने यहुदी लोकांना स्रा दिला होता. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे गेले. तो शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूबरोबर उच्च याजकांच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तू त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला.